Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

 मुकद्दर केला सप्लायर्स, न्हावी- अज़ीज़ भाई मो. ☎ 9823970068







अहोरात्र सेवा देणारे डॉ.शेख लाल यांचा सत्कार सन्मान न होणे हे दुर्भाग्यपूर्ण - श्री.विकास देशमुख यांनी व्यक्त केली खंत

 

अहोरात्र सेवा देणारे डॉ.शेख लाल यांचा सत्कार सन्मान न होणे हे दुर्भाग्यपूर्ण - श्री.विकास देशमुख यांनी व्यक्त केली खंत


रावेर /प्रतिनिधी

येथील डॉक्टर बांधव हे, आजारी असलेल्या लोकांचे उपचार  करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करत आहेत यात शंका नाही मात्र  रावेर येथे गेल्या मागील वर्षापासून कोरोना सारख्या आजाराशी दोन दोन हात करण्यासाठी व लोकांना आरोग्यसेवा देण्यासाठी  डॉ शेखलाल यांचे नाव आवर्जून घावे लागेल 

जेव्हा पासून कोरोना आजाराने आपल्या देशात पाळेमुळे रोवली तेव्हापासून रावेर येथील चावडी जवळील डॉ.शेखलाल हे

दिवस-रात्र सेवा देत आहेत  उपचारासाठी आलेल्या लोकांना सहानुभूती देऊन त्यांच्या जवळ बसून त्यांची तपासणी करत आहेत त्यामुळे बऱ्याच लोकांचा अर्धा आजार बरा होत आहे कारण अजारापेक्षा लोकांच्या मनात असलेली भीती बाहेर काढणे आवश्यक आहे आणि तेच कार्य  डॉ शेखलाल यांच्या कडून होत आहे

असे असून सुद्धा  आज पर्यंत कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही व अथवा त्यांना सन्मानित करण्यात आलेलं नाही ही खंत आज मला वाटत आहे अशी प्रतिक्रिया रावेर शिक्षण संवर्धक संघाचे संचालक विकास देशमुख यांनी व्यक्त केली आहे

डॉ शेखलाल यांच्याकडे पेशंट बाहेर गावाहून, दुरदुरून येतात व उपचार घेतात व त्यांचा आजार सुद्धा बरा होत आहे हे माझ्या डोळ्यानी मी पाहिले असल्याचे देशमुख म्हणतात

 डॉक्टर साहेबांना डायबिटीज बीपी व स्टोनचा त्रास असल्यावर सुद्धा रात्रंदिवस पेशंट बघणे हे त्यांचं कार्य सुरू आहे कुठल्याही प्रकारे  पैशाची आडकाठी न ठेवता एखाद्या जवळ पैसे नसल्यास नंतर द्या पण अगोदर उपचार घ्या व बरे व्हा हे त्यांचं वाक्य आहे. अशा समाज सेवा करणाऱ्या व्यक्ती कडे शासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का ? असा प्रश्न देखामुख यांनी उपस्थित केला आहे.

आज अख्या रावेर तालुका व बाहेर गावचे पेशंट येथे येतात जळगाव,मलकापूर,जामनेर ,भुसावळ, वरणगाव अशा भरपूर ठिकाणचे लोकं या ठिकाणी   येतात हे मी माझं घर जवळ असल्यामुळे मी समक्ष माझ्या डोळ्यांनी बघत आहे.  रात्र असो अथवा दिवस, कितीही पेशंट किती वाजता  आले तरी त्याला कुठल्याही प्रकारचे आडकाठी न करता उपचार करून समाजसेवा करत आहेत

खरंच अशा सर्व डॉक्टरांना सल्यूट आहे.जे डॉक्टर  आपल्या जिवाची पर्वा न करता मेहनत घेत असतील  अशा सर्व डॉक्टर बांधवांना  शासना मार्फत नक्की सन्मानित करण्यात यावे  अशी अपेक  श्री.विकास देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments