Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

 मुकद्दर केला सप्लायर्स, न्हावी- अज़ीज़ भाई मो. ☎ 9823970068







जळगावकर दहशतीखाली; जिल्ह्यात करोना बळींची संख्या ५०० पार

 जळगावकर दहशतीखाली; जिल्ह्यात करोना बळींची संख्या ५०० पार




जळगाव: ३१ जूलै २०२०
             जळगाव जिल्ह्यातील करोना संसर्ग वेगाने पसरत आहे. जिल्हा प्रशासनाला गुरुवारी रात्री प्राप्त झालेल्या तपासणी अहवालांमध्ये २६७ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. तर दिवसभरात १३ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५०६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. 


             जळगाव जिल्हा प्रशासनाला गुरुवारी तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यात २६७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात सर्वाधिक ८६ रुग्ण हे एकट्या जळगाव शहरातील आहेत. भुसावळ ८, चाळीसगाव २८ असे नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादयक बाब म्हणजे आज मुक्ताईनगर व बोदवड येथे आज एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.

            जळगाव जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सद्यस्थितीत १० हजार ८५८ इतकी झाली आहे. त्यातील ७ हजार २८७ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. गुरुवारी २७१ जणांना डिस्चार्ज मिळाला. तर ३ हजार ६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी दिवसभरात १३ जणांचा करोनामुळे मृ्त्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ३, अमळनेर, यावल व जळगाव तालुक्यातील प्रत्येकी २ जण तर पाचोरा, चोपडा, पारोळा व रावेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ५०६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

Post a Comment

0 Comments