Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

 मुकद्दर केला सप्लायर्स, न्हावी- अज़ीज़ भाई मो. ☎ 9823970068







अभिनेते संजय दत्त लीलावती रुग्णालयात दाखल

अभिनेते संजय दत्त लीलावती रुग्णालयात दाखल

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संजय दत्त यांना श्वास घेण्यास त्रास होत


मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संजय दत्त यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Sanjay Dutt admitted in Lilavati hospital)

मिळालेल्या माहितीनुसार, संजय दत्त यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. मात्र सुदैवाने ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे संजय दत्त यांना लीलावती रुग्णालयातील नॉन-कोव्हिड वॉर्डमध्ये भरती करण्यात आलं आहे. दरम्यान जर त्यांची प्रकृती स्थिर राहिली तर त्यांना उद्या डिस्चार्जही देण्यात येईल, असे सांगितले जात आहे.

   संजय दत्त हे लॉकडाऊनच्या काळात आपल्या कुटुंबापासून लांब होते. त्यांची पत्नी मान्यता दत्त ही दोन्ही मुलांसह दुबईला होते. या दरम्यान त्यांनी आपल्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

संजय दत्त यांचा पानीपत चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता ते सड़क 2, शमशेरा, भुज, केजीएफ, पृथ्वीराज आणि तोरबाज या चित्रपटांच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. मात्र कोरोनामुळे चित्रपटांच्या शूटींगला ब्रेक लावण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments