Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

 मुकद्दर केला सप्लायर्स, न्हावी- अज़ीज़ भाई मो. ☎ 9823970068







राज्यात उद्यापासून 'लालपरी' धावणार आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी

 

राज्यात उद्यापासून 'लालपरी' धावणार आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी : परिवहन मंत्री

मुंबई:कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा बंद होती. परंतु, आता जिल्हाबंदी सरकारने उठवली आहे. मात्र, खासगी वाहनांसाठी ई-पास लागू राहणार आहे.



राज्यात उद्यापासून सर्वसामान्यांच्या एसटीला आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. गणेशोत्सवानिमित्त हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. यासाठी बस किंवा प्रवाशांना परवानगी किंवा ई-पासची गरज लागणार नाही. लालपरी सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे थांबलेला गावगाडा पुन्हा रुळावर येण्यास मदत होणार आहे. एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचं पालन करणं गरजेचं आहे.

उद्यापासून एसटीची साधी,निमआराम,शिवशाही, शिवनेरी या सर्व प्रकारच्या सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होतील त्यातील लांब व मध्यम पल्याच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध होतील. या प्रवासासाठी कोणत्याही ई-पासची आवश्यकता नसेल व कोणतेही ज्यादा दर आकारले जाणार नाहीत: परिवाहन मंत्री 


Post a Comment

0 Comments